Punjab Elections : पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. तसेच पक्षांतरही वाढले आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 50 वर्षांपासून पक्षासोबत असलेल्या ज्येष्ठ नेत्याने साथ सोडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  जोगींदर मान यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जोगींदर मान यांनी मंत्रिपदही भूषावलेय. जोगींदर मान यांच्या पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. 


जोगींदर मान यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर आज, शनिवारी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय.  पंजाब विधानसभा निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या असताना त्यांनी पक्षाची साथ सोडली.  आपचे पंजाबमधील आमदार आणि राज्याचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी जोगींदर मान यांचं शनिवारी पक्षात स्वागत केलं.


जोगींदर मान हे मागील ५० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांनी काँग्रेसची सत्ता असतानाही मंत्रिपदेही भूषवली आहे. त्यांची पंजाबमधील अनुसूचित जातीचे नेते म्हणून ओळख  आहे.  शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल पंजाबमधील काँग्रेस सरकारवर नाराज होते.  याच नाराजीतून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आज जोगींदर मान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.






पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022 रोजी संपणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल.


आधीचं बलाबल काय? 
पंजाब          - 117
भाजप          - 3
काँग्रेस          - 77
आप             - 20
अकाली दल       - 15
इतर             - 2


यावेळी हे मुद्दे गाजणार 
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न


संबधित बातम्या :
Punjab Election 2022: पंजाबचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवेल : नवज्योत सिंह सिद्धू
UP Election 2022 : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार
Punjab Election 2022 Date : पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात होणार मतदान, 10 मार्चला निकाल 
ABP Opinion Poll : कोण होणार 'पंजाबचा किंग'? आपची मुसंडी तर भाजप चौथ्या स्थानी