Punjab Assembly Election 2022 : पंजाब (Punjab) मध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतरच पंजाबमध्ये कोणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. परंतु, त्याआधी जाणून घ्या पंजाबमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहे? आणि तो कोणत्या पक्षाचा आहे?
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि पंजाब इलेक्शन वॉचने दिलेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बादल यांची संपत्ती 202 कोटी रूपये असून ते पंजाबमधील जलालाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
सुखबीर सिंह बादल यांनी पाच वर्षात त्यांची संपत्ती तब्बल शंभर कोटींनी वाढल्याचे घोषीत केले आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची संपत्ती 102 कोटी रूपये असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर 2017 पासून 102 वरून आता 2022 मध्ये 202 कोटी रूपये झाल्याचे बादल यांनी जाहीर केले आहे.
सुखबीर सिंह बादल यांचे चुलत भाऊ काँग्रेस नेते मनप्रीत सिंह बादल यांची संपत्ती 2017 पेक्षा 40 कोटींनी वाढली आहे. 2022 मध्ये मनप्रीत यांची संपत्ती 72 कोटी असल्याचे त्यांनी घोषीत केले आहे. मनप्रीत हे बठिंडा शहर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्याखालोखाल सुनाम मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले आम आदमी पक्षाचे नेते अमन अरोरा यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली आहे. 2017 मध्ये अरोरा यांची संपत्ती 65 कोटी रुपये होती. ती 2022 मध्ये 95 कोटी रूपये झाली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांची संपत्ती 48 कोटींवरून 68 कोटींवर
दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांची संपत्ती 48 कोटींवरून 68 कोटी झाली आहे. 2017 पेक्षा त्यांच्या संपत्तीत 20 कोटींनी वाढ झाली आहे. कॅप्टन अमरिंदर हे पूर्वीच्या पटियालाच्या राजघराण्यातील आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे वैयक्तिक कोणतेही वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Saint Ravidas Jayanti : संत रविदास जयंती; राजकीय नेते करणार शक्तीप्रदर्शन, पाहा कोणाची कुठे होणार सभा?
- Manmohan Singh Video: विदेशी नेत्यांना मिठी मारुन, बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंहांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Ashwani Kumar : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचा राजीनामा