चंढीगड : देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना ही लाट थोपवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय भारतासमोर आहे.  देशात कोरोना लसीकरण चालू आहे. बर्‍याच लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. काही लोकांनी पहिला डोस घेतला आहे. दरम्यान असे बरेच लोक आहेत जे अद्याप लस घेण्यास घाबरत आहेत. त्यांच्या मनात लसीबाबत अनेक शंका आहेत. अशा परिस्थितीत 45 वर्षांवरील लोकांना कोराना लसीकरणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेता सोनू सूदला पंजाबने कोरोना लसीकरण मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले.


ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन करताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, "अभिनेता सोनू सूद यांची पंजाब सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सोनू सूद ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यामुळे कोरोना लसीकरणाबद्दल अधिक जागरुकता लोकांमध्ये निर्माण होईल. मी राज्यातील सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी लसीकरण लवकरात लवकर करावे.''


Maharashtra Coronavirus Vaccination : लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 1 कोटींचा टप्पा






Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय


कोरोना लसीकरण देशात जोरात सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 एप्रिल रोजी म्हणजेच ज्योतिबा फुले जयंती पासून 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीपर्यंत 'टीका उत्सव' सुरू केला आहे. या दरम्यान सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.