पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजणाऱ्या पिंपळे सौदागर(Pimple Saudagar) परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी घेऊन एका 14 वर्षीय मुलाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 


आज(शनिवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. पिंपळे सौदागर(Pimple Saudagar) येथील रोज लँड सोसायटीच्या एक्स विंगच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. मल्हार मकरंद जोशी असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षे मुलाचं नाव आहे. तो इयत्ता नववी मध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील गावी गेलेले असताना ही घटना घडली आहे. 


आई-वडील गावी गेल्यामुळे तो आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. तेव्हा त्याच घराच्या गॅलरीतून त्याने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचे शव औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत काहीही समजू शकलेलं नाही. यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर त्याच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना समोर येत आहेत.