नागपूर : जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथील अवंतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे. "या दहशतवादी हल्ल्याला जशास तसे उत्तर द्या," असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केले आहे. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.


सरसंघचालक म्हणाले की, "आम्ही आत्तापर्यंत खूप सहन केले आहे, आजचा प्रसंगही तसाच आहे. उरी येथे भारतीय जवानांवर हल्ला झाल्यानंतर आपण प्रत्युउत्तर दिले होते, तसेच उत्तर आत्ताही देण्याची गरज आहे."

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या, अशी मागणी होऊ लागली आहे.

या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि इंटेलिजेंड ब्युरोच्या संचालक या दोघांनीही जम्मूमधील घडामोडींबाबत डोवाल यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.

संबधित बातम्या

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद