Pulses Price List Today : एकीकडे गॅस सिलेंडर (Gas Cylinder Price) आणि दूधासह (Milk Price) दैनंदिन वस्तूंना महागाईचा फटका बसत आहे. या महागाईचा सामना करत असतानाच दिलासादायक बातमी म्हणजे डाळींचे भाव खाली आले आहेत. डाळींच्या किंमती घसरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मूग (moong dal rate) आणि उडीदाच्या (urad dal rate per kg) डाळींसह अनेक डाळींच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. डाळींचे दर किलोमागे किती रुपयांनी खाली आले आहेत ते जाणून घ्या.
काय आहेत डाळींचे ताजे दर ?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मूग डाळीची भारतीय सरासरी किरकोळ किंमत 4 रुपयांनी घसरून 102.36 रुपये प्रति किलो झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत मूग डाळीची किरकोळ किंमत 106.47 रुपये प्रति किलो होती.
दर कमी का झाले ?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, मे 2021 मध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत स्टॉकच्या किंमतींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मिलर्स, आयातदारांसाठी किमतींमध्ये घसरण झाली आहे.
तूर डाळीबाबत केली होती घोषणा
सरकारने मे ते ऑक्टोबर 2021 दरम्यान तूर, उडीद आणि मूग मोफत आयात करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर तूर आणि उडीदच्या मोफत आयातीला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मंत्रालयाने सांगितले की, आयात धोरणाच्या उपाययोजनांमुळे गेल्या दोन वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे.
याशिवाय, नुकतीच उडीद डाळीच्या दरातही कपात करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी नोंदविल्याप्रमाणे उडीद डाळीची सरासरी घाऊक किंमत 9,410.58 रुपये प्रति क्विंटल होती. तर 25 फेब्रुवारी 2021 रोजी ही किंमत 9,904.39 रुपये प्रति क्विंटल होती. यामध्ये 4.99 टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे, 24 फेब्रुवारी 2022 रोजी उडीद डाळीची सरासरी घाऊक किंमत 9,444.06 रुपये प्रति क्विंटल होती, जी 24 फेब्रुवारी 2021 रोजी 9,896.95 रुपये प्रति क्विंटल होती.
महत्वाच्या बातम्या :
- Milk Price Hike : किचन बजेट सांभाळा! 'अमूल'नंतर आता 'या' ब्रॅण्डच्या दूध दरात वाढ
- Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
- LPG Cylinder : महागाईची चाहूल; आजपासून सिलेंडर 105 रुपयांनी महागला, तुमच्या शहरात LPG चे दर काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha