नवी दिल्ली: रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी पब्लिक अकाऊंटस् कमिटीने नोटाबंदीवर प्रश्नावली पाठवली आहे. या दोघांच्याही उत्तरानं समाधान झालं नाही, तर पीएसीच्यावतीने मोदींनाही समन्स बजावू शकते. काँग्रेस नेते आणि पीएसीचे प्रमुख के.व्ही.थॉमस यांनी तसा इशारा दिलाय.


पीएसीनं उर्जित पटेल आणि इतर अधिकाऱ्यांना नोटाबंदीच्या विषयावर भलीमोठी प्रश्नावली पाठवली आहे. ज्याची उत्तरं 20 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश पीएसीने दिले आहेत.

उर्जित पटेल आणि अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या उत्तरांवर पीएसीत चर्चा होईल, आणि जर उत्तरं समाधानकारक आढळली नाहीत, तर सर्वानुमते पंतप्रधानांना पीएसीससमोर उभं करण्याचा निर्णय होईल.