जम्मूमध्ये राडा, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 03:26 AM (IST)
जानीपूर (जम्मू-काश्मीर) : जम्मूच्या जानीपूरमध्ये काल रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी एका गटानं थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन आणि इंटरनेवर वापरावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळात प्रवेश केल्यावरुन एका युवकाला काही जणांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानं भडका उडाला आणि हा राडा झाला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करत पेटवून दिली. तब्बल सात तास आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही धुमश्चक्री सुरु होती. यावेळी वार्तांकन करायला आलेले सात पत्रकारही या घटनेत जखमी झाले आहेत.