एअर इंडियाची विक्री महाघोटाळ्याची सुरुवात असेल : सुब्रमण्यम स्वामी
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2018 01:36 PM (IST)
एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले होते. त्यावरुन भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला.
मुंबई : ''एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची प्रस्तावित विक्री ही आणखी एका महाघोटाळ्याची सुरुवात असेल. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे, असं काही आढळून आल्यास कायदेशीर तक्रार दाखल करु,'' असं ट्वीट भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाला त्यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले होते. केंद्र सरकारच्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी हे संकेत दिले होते. सुयोग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे अंग काढून घ्यावं, या मताशी सरकार अनुकूल असल्याचं ते म्हणाले होते. सध्या 'एअर इंडिया'चा बाजारपेठेतील हिस्सा अत्यंत कमी आहे. त्यातच कंपनीवर 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने सरकार ही कंपनी विकणार असल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या :