Prophet Mohammad Remarks Row : प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. या प्रकरणावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत नुपूर शर्माला अटक करावी, असे सांगितले. नुपूर शर्माने माफी मागितली नसून तिने आपल्या वक्तव्यात इंग्रजीत 'इफ' लिहिल्याचे त्यांनी सांगितले. 


पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख कळत नाही - ओवेसी
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे सरकार बुलडोझरचे राजकारण करते. काही झालं की बुलडोझर सुरू होतो, मग आता नुपूर शर्माच्या घरावर बुलडोझर चालवणार का? ते म्हणाले की, जेव्हा देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांचे ऐकत नाहीत. पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख कळत नाही. भाजपने देशातील मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


...तर कानपूरमध्ये हिंसाचार झाला नसता.


ओवेसी पुढे म्हणाले की, नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई झाली असती तर, कानपूरमध्ये हिंसाचार झाला नसता. आता तेथील मुस्लिमांवर एनएसए लादले जात आहे. कानपूर प्रकरणात मी योग्य आणि चुकीचा निकाल देऊ शकत नाही. आम्ही हिंसाचाराच्या पाठीशी उभे नाही. सरकारने आधी काही केले असते तर हिंसाचार झाला नसता, असे आम्ही म्हणत आहोत. आधी कारवाई झाली असती तर ही गोष्ट संपली असती.  


वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यां नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही?
नुपूर शर्मा यांना पक्षातून हाकलून द्यावं लागलं हे भाजपला नंतर का आठवलं, असं ते म्हणाले. भाजप आपल्या लोकांना जाऊन शिवीगाळ करायला सांगते. ते म्हणाले की, भाजप आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील वादविवादांमध्ये द्वेषपूर्ण भाषण देण्यास सांगतो. पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ते म्हणाले की, राजकीय पक्ष या विषयावर काहीही बोलले नाहीत, कारण त्यांची हिंदू मते गेली असती. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपने रविवारी पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून 6 वर्षांसाठी निलंबित केले. नुपूर शर्मा 27 मे रोजी एका खासगी वाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्यापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू झाले. यादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या वादावर चर्चा होत होती. यादरम्यान नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर काही आक्षेपार्ह कथित टिप्पणी केली होती. यानंतर नुपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर पैगंबराचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर देशभरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि नुपूर शर्माच्या अटकेची मागणीही जोर धरू लागली. 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.



इतर महत्वाच्या बातम्या


Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती 


Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले