लखनौ : राजकारणात 'फुलटाईम' प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांची आज ट्विटरवर देखील जोरदार 'एन्ट्री' झाली आहे. @priyankagandhi हे त्यांचे ऑफिशिअल ट्विटर हँडल आजपासून सुरु झाले आहे.


काँग्रेसच्या सरचिटणीस तसेच पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणुन नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी लखनौ येथे रोड शो करुन शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यापुर्वी त्यांनी ट्विटरवर एन्ट्री केली. प्रियांका यांच्या ट्विटर अकाउंटवरून सध्या एकही ट्विट करण्यात आलेले नाही. प्रियांका यांनी सध्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलसह राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल या नेत्यांना फॉलो केले आहे.

प्रियांका यांचे ट्विटर अकाउंट 'व्हेरीफाइड' आहे.  आतापर्यंत 80 हजारपेक्षा जास्त लोकांनी त्यांना आज दिवसभरात फॉलो केले आहे.