नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. प्रियंका गांधींना मानसिक आजार असून, तोल सुटका की त्या लोकांना मारहाण करतात, अशा शब्दात स्वामींनी प्रियांका गांधींवर टीका केला.

Continues below advertisement


प्रियंका गांधी यांना बायपोल्ट्री नावाचा मानसिक आजार असून, तोल सुटका की लोकांना मारहाण करतात. सार्वजनिक जीवनात वावरताना हे घातक ठरू शकतं. प्रियांका गांधींचा स्वत:वरील ताबा कधी सुटेल हे सांगता येत नाही, असा शब्दात सुब्रह्मण्यम स्वामींनी प्रियांका गांधींवर टीका केली.


भाजपच्या नेत्यांची प्रियांका गांधीवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. विनोद झा, कैलास विजवर्गीय यांचाही तोल घसरला आहे. प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांची त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.


निवडणुका लढण्यासाठी काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे आता काँग्रेसकडून चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत, अशी टीका भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. तर सौंदर्यानं मतं मिळवता येतात, या चुकीच्या गृहितकावर काँग्रेस सध्या चालली आहे. पण निवडणूक ही सुंदरतेच्या बळावर जिंकता येत नाही, अशी टीका विनोद झा यांनी केली होती.



संबंधित बातम्या


काँग्रेसची मोठी खेळी, प्रियांका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी


प्रियांका गांधींविषयी माहित नसलेल्या दहा गोष्टी


प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात 'गेम चेंजर' ठरणार?


प्रियांका गांधी या 21 व्या शतकातील इंदिरा गांधी : सुशीलकुमार शिंदे


प्रियांका गांधी काँग्रेसचा चॉकलेटी चेहरा, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य


सौंदर्याशिवाय प्रियांकाचं काहीच कर्तृत्व नाही, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान


प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार?