Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर प्रियंका गांधींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण तरीही डॉक्टरांनी त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत लिहिले आहे,"माझ्या कुटुंबातील एका सदस्याला आणि माझ्या कर्मचार्‍यांपैकी एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांनी मला विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काही दिवसांनी पुन्हा एकदा चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे".





गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी ट्वीट करत त्यासंदर्भात माहिती दिली होती. 


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी संपूर्णपणे त्यांच्या खांद्यावर असल्याचं दिसून येतंय. पण आता त्यांच्या घरातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्या काही दिवस प्रचारापासून दूर राहतील. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारावर याचा काहीसा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


संबंधित बातम्या


Centre on Covid19 : 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली


Mumbai-Goa cruise : कॉर्डिलिया क्रूझवरील 66 प्रवाशांना कोरोनाची लागण


Omicron : राज्यात आज ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक 40 रुग्णांची नोंद


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha