Covid Guidelines For Government Offices : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची छाया गडत होत चालली आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे अधिकच चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमाली जारी करण्यात आली आहे.  सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे, असे नियमालीत केंद्र सरकारने म्हटले आहे.

  






काय आहे नियमावलीत?
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे. सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना केंद्राकडून सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका.  दिव्यांग, अपंग असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही कार्यलयात न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गर्भवती महिलांनाही सूट देण्यात आली आहे. 


अनेक राज्यात निर्बंध -
देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जातायेत. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उद्यापासून पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. हरियाणात वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे निर्बंध कडक करण्यात आलेत. शाळा, महाविद्यालये, आंगणवाडी केंद्र बंद करण्यात आलेत.  राज्यात 12 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद राहणार आहेत. 12 तारखेनंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.  


24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद - 
गेल्या 24 तासांत देशात 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 582 झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रूग्णांचेही प्रमाण चांगले आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 846 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 42 लाख 95 हजार 407 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4 लाख 81 हजार 893 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशभरात आजपर्यंत 145 कोटींपेक्षा जास्त कोलांचे लसीकरण झाले आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live