नवी दिल्ली : काँग्रेससाठी 'करो या मरो' परिस्थिती बनलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, पक्षाने आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांच्या सरचिटणीसपदाची जबाबादारी दिली आहे. तसंच भाजपचा गड समजला जाणाऱ्या पूर्वांचलच्या प्रभारी म्हणूनही त्यांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेस कार्यकर्ते प्रियांका गांधींचा उल्लेख 'नवी रोशनी' म्हणून करतात. त्याचं कारण आहे सामान्यांच्या मनात असलेलं, देशाच्या राजकारणातील गांधी घराण्याचं वेगळं स्थान. 80 खासदार निवडणाऱ्या राज्यात जिंकण्याआधीच काँग्रेस अडचणीत आल्याचं मानलं जात असतानाच काँग्रेसने खेळलेली खेळी मास्टरस्ट्रोक मानली जाते.
प्रियांका गांधी गेमचेंजर ठरतील असंही मानलं जातं आहे. त्याची कारणही तसंच आहे.
प्रियांका गांधींचं व्यक्तिमत्व हे प्रभावी आहे.
दिल्लीच्या मॉडर्न स्कूल, कॉन्व्हेंट ऑफ जिजस अँड मेरीमधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.
दिल्ली विश्वविद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे.
त्यांच्या वक्तृत्वात सामान्य माणसांची मनं जिंकण्याची कला असल्याचं सांगितलं जातं.
रॉबर्ट वाड्रा या उद्योजकाशी लग्न झाल्यानंतर त्या सक्रिय राजकारणापासून दूर गेल्या.
काँग्रेसची मोठी खेळी, प्रियांका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी
पण रायबरेली आणि अमेठी या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी त्या सांभाळत आल्या आहेत.
नोटाबंदीवेळी प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर टीकेची संधीही साधली.
प्रियंका आणि राहुल निवडून येत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधींचा खूप जास्त प्रभाव आहे.
अमेठीत तर "अमेठीचा डंका, बेटी प्रियांका" अशी घोषणाही दिली जात असते.
काँग्रेसने आता सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवल्याने थेट सक्रिय राजकारणात आलेल्या प्रियंकांसाठी मार्ग सोपा नाही.
एकीकडे जबाबदारी मिळालेल्या भागातील पक्षाची कमजोर प्रतिकूल परिस्थिती आणि त्याचवेळी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर होत असलेले आरोप.
या साऱ्यांमधून मार्ग काढत त्यांना स्वत:च राजकीय करिअर घडवतानाच काँग्रेस पक्षालाही महत्त्वाच्या राज्यात संजिवनी द्यायची आहे.
त्या यशस्वी ठरल्या तर नक्कीच गेमचेंजर ठरतील आणि त्यांचे बंधू राहुल गांधींनी घेतलेला हा निर्णय भाजपाविरोधातील सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल असा अंदाज आहे.
प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात 'गेम चेंजर' ठरणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2019 02:34 PM (IST)
काँग्रेस कार्यकर्ते प्रियांका गांधींचा उल्लेख 'नवी रोशनी' म्हणून करतात. त्याचं कारण आहे सामान्यांच्या मनात असलेलं, देशाच्या राजकारणातील गांधी घराण्याचं वेगळं स्थान.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -