PM Modi America Visit : फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान येथे AI शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील, ज्यामध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि चीनचे उपपंतप्रधान यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहतील. PM मोदी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी पॅरिसला पोहोचतील, जिथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेलाही जाणार आहेत.


ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींचा दौरा


भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा असेल. नवीन प्रशासन आल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत, पंतप्रधान मोदींना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. 


ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी 2017 आणि 2019 मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेतला होता. अमेरिकेच्या नवीन परराष्ट्रमंत्र्यांची पहिली द्विपक्षीय बैठक भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (6 फेब्रुवारी 2025) अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगेथ यांच्याशी फोनवर चर्चा केली.


फ्रान्समधील एआय शिखर परिषदेत पंतप्रधान उपस्थित राहणार 


11 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम मोदी एआय ऍक्शन समिटमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इंडिया फ्रान्स सीईओ फोरमला संबोधित करणार आहेत. एआय ॲक्शन समिट अत्यंत महत्त्वाची आहे, अशा प्रकारची ही तिसरी उच्चस्तरीय समिट आहे. यापूर्वी ही शिखर परिषद यूके आणि दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितले की आम्ही अशा AI अनुप्रयोगांच्या बाजूने आहोत जे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत. पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारी रोजी फ्रान्समधील मार्सेली येथे भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करतील. त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही तेथे उपस्थित राहणार आहेत.


भारतीय हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात


दरम्यान, अमेरिकेतून निर्वासित 104 भारतीयांना ( Indian Migrants Deportation) घेऊन आलेलं अमेरिकन सैन्याचे सी-17 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले. या लोकांच्या पायाला बेड्या बांधण्यात आल्या होत्या, तर त्यांच्या हातालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. काही लोकांनी मीडियाला सांगितले की, त्यांना विमानात एकाच जागी बसून राहण्यास सांगितले होते. वॉशरूममध्येही जाण्याची परवानगी नव्हती. लोकांनी आग्रह केल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना वॉशरूममध्ये नेले आणि दरवाजा उघडून आत ढकलले. 


इतर महत्वाच्या बातम्या