नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीबद्दल मोठी सुनावणी पटियाला हाऊस कोर्टाने केली आहे. पटियाला हाऊस न्यायालयाकडून निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. पटियाला हाऊस न्यायालयाच्या निर्णयाने या नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर गेली आहे. त्यामुळे पुढचा आदेश येईपर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.


दुपारी दोन वाजता सुनावणी पुन्हा एकदा घेण्याचं ठरलं, आरोपी पवन गुप्ताचे वकील ए.पी.सिंग यांनी दयेचा अर्ज केल्याची माहिती दिली, तसंच या केसमध्ये काही नवीन अपडेट्स असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आरोपी अक्षय आणि पवन गुप्ता यांचा दया अर्ज फेटाळल्यानंतरही कोर्टाने पुन्हा एकदा सुनावणीचा निर्णय घेतला याचा निकाल राखून ठेवण्यात आला. सकाळी पवन गुप्ता या आरोपीची क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्यात आली होती तेव्हा फाशीला स्थगिती देण्याबद्दलची कोणतीही घोषणा कोर्टाने केली नाही. मात्र ती याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करणं हा उपाय आरोपींकडे उपलब्ध होता आणि त्याचाच वापर आरोपींकडून करण्यात आला.


Nirbhaya Case | निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा?



निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी फेटाळली. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पवन गुप्ताने याच्या वकिलांनी क्युरेटिव्ह याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्याला ही दया याचिकाही तीन मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागणार होती.


दुपारी आरोपी पवन गुप्ताच्या वकिलांनी हा दयेचा अर्ज दाखल केला आणि कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर 14 दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे आरोपी पवननं दया याचिका दाखल केली आणि 14 दिवसांनंतर म्हणजेच 20 मार्चपर्यंत आरोपींना फाशी देता येणार नाही. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाणार नाही ही अधिकृत माहिती समोर आली आहे.