मुंबई : आजपासून काशी - तमिळ संगमचा ( Kashi Tamil Sangamam) दुसरा टप्पा सुरु झाला असून वाराणसीतील (Varanasi) नमो घाट (Namo Ghat) येथे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी उद्घाटन केल आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेतून याचे आयोजन करण्यात आलंय.  तामिळनाडूत भाजपला (BJP) मिळणाऱ्या राजकीय प्रतिसादात काशी - तमिळ संगमची महत्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी आणि वाराणसी दरम्यान धावणाऱ्या  काशी तमिळ संगम एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 17 डिसेंबर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी तमिळ संगमम येथे केलेल्या भाषणात नवा प्रयोग केला. त्याच वेळी त्यांच्या भाषणाचे तमिळमध्ये भाषांतर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाया प्रयोगाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा नवीन वापर झाला आहे. ही एक नवीन सुरुवात आहे आणि आशा आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सोपे होईल.


पंतप्रधान मोदी काय म्हणाले?


काशी तमिळचे एक अद्भुत नाते आहे. तुम्ही सर्वजण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून इतक्या मोठ्या संख्येने काशीला आला आहात. काशीमध्ये तुम्ही सर्वजण पाहुण्यांपेक्षा माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून जास्त आहात. मी तुम्हा सर्वांचे 'काशी तमिळ संगम' मध्ये स्वागत करतो.'तमिळनाडूतून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून त्याच्या दुसऱ्या घरात येणे, तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीच्या ठिकाणाहून काशी विशालाक्षीच्या ठिकाणी येणे. म्हणूनच तामिळनाडूतील लोक आणि काशीतील लोकांच्या हृदयात असलेले प्रेम आणि नाते वेगळे आणि अद्वितीय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ ही भावना संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करतानाही दिसून आली. नवीन संसद भवनात पवित्र सेंगोल स्थापित करण्यात आले आहे. आदिनामच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हेच सेंगोल 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले. हा 'एक भारत श्रेष्ठ भारत' च्या भावनेचा प्रवाह आहे, जो आज आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 














हेही वाचा : 


PM Narendra Modi : 2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सूरतमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास