UP Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) आज उतर प्रदेशमधील (UP) प्रयागराजच्या दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान जपळपास दोन लाख महिलांच्या उपस्थित होणाऱ्या एका खास कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ ही हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुपारी दीड वाजल्यापासून 1.50 पर्यंत वीस मीनिटे भाषण करतील तर पंतप्रधान 1.51 पासून 2.20 पर्यंत आपले भाषण करतील. 


या कार्यक्रमाबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना आवश्यक कौशल्य, प्रोत्साहन आणि पाायभूत साधनांचा पूरवठा करण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यावेळी विविध बचत गटांच्या (SHG) खात्यांमध्ये एक हजार कोटी रूपयांची रक्कम जमा करणार आहेत. या रकमेचा जवळपास 16 लाख महिलांना लाभ होणार आहे. 


"ही रक्कम दीनदयाळ उपाध्याय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजीवन मिशनच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.  यात 80 हजार बचत गटांना प्रती गट 1.10 लाख रूपये फंड मिळेल तर 60 हजार बचत गटांना प्रती गट 15 हजार रूपयांचा निधी मिळेल. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. 







"व्यवसाय प्रतिनीधी-सखींना प्रोत्साहित करण्यासाठी, पंतप्रधान 20 हजार जणांच्या खात्यात पहिल्या महिन्याचे स्टायपेंड म्हणून 4 हजार रुपये जमा करतील. ही रक्कम जमा झाल्यानंतर व्यवसाय प्रतिनीधी-सखी पायाभूत सुविधा आणि आर्थिक सेवांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू करतील. त्यावेळी त्यांना त्यांच्या कामात स्थिर राहण्यासाठी सहा महिन्यांसाठी 4,000 रुपये स्टायपेंड दिला जातो आणि नंतर कमिशन दिले जाते. याद्वारे हे बचत गट आपली कमाई सुरू करतील. असेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. 


"पंतप्रधान मोदी या कार्यक्रमातच मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेअंतर्गत एक लाख पेक्षा जास्त लाभार्थींच्या खात्यात जवळपास 20 कोटी रूपये जमा करतील. ही योजना मुलींना त्यांच्या प्रगतीसाठी वापरता येईल. 15 हजार लाभार्थींना याचा लाभ होणार आहे." अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.  
महत्वाच्या बातम्या