Omicron : देशात एकीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) धोका वाढत असताना लोक ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या (New Year Celebration) तयारीला लागले आहेत. मात्र जगात काही देशांनी सतर्कता बाळगत ख्रिसमस आणि नवे वर्ष साजरं करण्यावर निर्बंध लावले आहेत. केंद्र सरकारने ख्रिसमस आणि नवं वर्ष साजरे करण्यावर निर्बंध लावले आहेत. 


अनेक देशात निर्बंध लागू



  • नेदरलँड देशाने 14 जानेवारीपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तेथे आता शाळा, कॉलेज, वास्तू संग्रहालय, हॉटेल पूर्णपणे बंद राहणार आहेत.

  • ब्रिटन सरकारही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.

  • ब्रिटनमध्ये सध्या नाईट क्लब आणि पार्टीमध्ये जाण्यासाठी लसीकरणाचं सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आलं आहे.

  • इस्त्राइल देशाने अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीसह 10 देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे.

  • फ्रांस सरकारनेही ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या आतिषबाजीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

  • आयलँड सरकारने पब आणि बारमध्ये रात्री आठ वाजेनंतर प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.


भारतात ओमायक्रॉनचे वाढते संकट, बाधितांची संख्या 161 वर 
राजधानी दिल्लीत गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच एका दिवसात 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यनिहाय महाराष्ट्र- 54, दिल्ली-32, तेलंगाणा- 20, राजस्थान-17, गुजरात- 13, केरळ-11, कर्नाटक-8, उत्तर प्रदेश 2 आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये ओमायक्रॉनचे प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha