President Droupadi Murmu To Address Nation : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज (14 ऑगस्ट रोजी) राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाने रविवारी (13 ऑगस्ट) एका निवेदनात सांगितले की, हे संबोधन संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio) संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाणार आहे.


"दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संबोधनाचे प्रसारण दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केले जाईल. ऑल इंडिया रेडिओ रात्री 9.30 वाजता आपल्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर संबोधनाची प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित करेल, " असे निवेदनात म्हटले आहे."


15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील


15 ऑगस्ट रोजी भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी मंचावरची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) लाल किल्ल्यावर (Red Fort) राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यानंतर ते ऐतिहासिक वास्तूच्या तटबंदीवरून देशातील जनतेला संबोधित करतील.


स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात 1,800 लोक सहभागी होतील


संरक्षण मंत्रालयाने रविवारी (13 ऑगस्ट) सांगितले की, स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सुमारे 1,800 व्यक्तींना 'विशेष पाहुणे' म्हणून समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'विशेष पाहुण्यांमध्ये' 400 हून अधिक गावांच्या सरपंचांचा समावेश आहे.


12 वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवले जातील


मंत्रालयाने सांगितले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारने आपल्या विविध योजनांसाठी 12 वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट्स उभारले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्टेशन, राजीव चौक मेट्रो स्टेशन, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वाराचा समावेश आहे.


स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर 15 - 20 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या 12 पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.


महत्त्वाच्या बातम्या :


Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देश सज्ज, देशातील 1 हजार 800 जणांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण