नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च) देशातील 4 व्यक्तिमत्त्वांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून 31 मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारला.






या लोकांना भारतरत्न मिळाले


माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचे चिरंजीव पीव्ही प्रभाकर राव यांना स्वीकारला. एम.एस.स्वामिनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ.नित्या राव यांना स्वीकारला. कर्पूरी ठाकूर यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी स्वीकारला. चौधरी चरण सिंह यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला. यंदा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींच्या कार्यकाळात हा सन्मान मिळाला आहे. 2024 मधील 5 सेलिब्रेटींसह आतापर्यंत हा सन्मान 53 जणांना मिळाला आहे.  






राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीच्या एक दिवस आधी 23 जानेवारी रोजी भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. मागासवर्गीयांच्या हिताचा पुरस्कार करण्यासाठी ते ओळखले जातात. 9 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी डॉ. एमएस स्वामीनाथन, पीव्ही नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली होती. स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. नरसिंह राव हे देशाचे 9 वे पंतप्रधान होते. चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. ते उत्तर प्रदेशचे 5 वे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या