नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यात दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर सहमती झाल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय. तर अमेरिकेकडून भारत अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. शिवाय, दहशतवादाविरोधी लढ्यात भारतासोबत कायम राहू असंही ट्रम्प यांनी म्हंटलंय. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी देणं थांबवावं, असा कडक इशाराही ट्रम्प यांनी दिलाय.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडं सर्व भारतीयांचे लक्ष लागलंय. या दौऱ्यातून भारताला काय मिळणार? हाच प्रश्न सर्वजण विचारत आहे. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजता नवी दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत अनेक मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहार यांसारख्या अनेक मुद्दयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपली मतं मांडली. यात दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर सहमती झाल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय. तर अमेरिकेकडून भारत अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलय.

साबरमती आश्रम भेट : ट्रम्प यांना बापूंचा विसर, तर ओबामांनी जिंकलं होतं भारतीयांचं मन

ट्रम्प यांना 21 तोफांची सलामी - 

ट्रम्प यांच्या आजच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी राष्ट्रपती भवनातून झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांचं स्वागत केलं. राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. शिवाय तिन्ही सैन्य दलांनी गार्ड ऑफ ऑनरही दिला. राष्ट्रपती भवनातील स्वागतानंतर ट्रम्प दाम्पत्यानं राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन केलं. भारत-अमेरिका मैत्रीचं प्रतिक म्हणून राजघाटावर ट्रम्प दाम्पत्यानं वृक्षारोपण केलं.

डोनाल्ड, मलेनिया ट्रम्प आणि मोदींव्यतिरिक्त रेड कार्पेटवर दिसलेली ‘ती’ महिला कोण?

दिल्ली येथील सरकारी शाळांमधील हॅप्पीनेस क्लासचा दौरा -
मेलानिया ट्रम्प दिल्ली येथील सरकारी शाळांमधील हॅप्पीनेस क्लासला भेट देत मुलांशी संवाद साधला. दुपारी तीन वाजता अमेरिकेच राष्ट्रपती यूएस दुतावास येथे जाऊन भारतातील मोठ्या उद्योगपतींना भेटले आहेत. संध्याकाळी जवळपास 7.25 वाजता ट्रम्प राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. रात्री 8 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री 10 वाजता दोघेही अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

Majha Vishesh | डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याने भारताला काय फायदा होणार? माझा विशेष