मुंबई : आयटी रिटर्न्स भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख जवळ येत आहे. वेळेत आयटी रिटर्न्स भरण्याचे अनेक फायदेही असतात. पण आयटी रिटर्न्स भरताना अनेकांचा गोंधळ उडतो. म्हणूनच आयटी रिटर्न्स भरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा गोंधळ दूर होऊ शकतो.
टॅक्सची अचूक माहिती द्या
आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो.
वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या
आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
मुलांच्या नावावर मिळालेले व्याज
जर तुम्हाला लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या नावावर मिळालेली व्याजाची रक्कमही तुमच्या इनकममध्ये दाखवणं गरजेचं असतं.
अचूक बँक डिटेल्स
आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.
ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.
आयटी रिटर्न्स भरताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 07:54 PM (IST)
आयटी रिटर्न्स भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख जवळ येत आहे. वेळेत आयटी रिटर्न्स भरण्याचे अनेक फायदेही असतात. पण आयटी रिटर्न्स भरताना अनेकांचा गोंधळ उडतो.
फाईल फोेटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -