नवी दिल्ली: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल जाहीर झाला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या वाटेवर कोण नेऊ शकेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 48 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या नंबरवर असले, तरी दोघांमधील अंतर हे खूपच आहे. अवघ्या 11 टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या 18 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करु शकतील. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून ही मोहीम सुरु केली. ज्यामध्ये सार्वजनिक सद्भावना, स्वच्छता, दारुबंदी, आरोग्य, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. ‘नॅशनल अजेंडा फोरम’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं. देशातील सुमारे 57 लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. कोणता नेता नॅशनल अजेंडा फोरम पुढे नेऊ शकतो? नरेंद्र मोदी- 48 टक्के राहुल गांधी -11.2 टक्के अरविंद केजरीवाल- 9.3 टक्के अखिलेश यादव -7 टक्के ममता बॅनर्जी - 4.2 टक्के मायावती-3.1 टक्के हा सर्व्हे कसा झाला? इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) चा सर्व्हे 57 लाख लोकांनी यामध्ये सहभाग घेतला 56 दिवसांच्या सर्वेक्षणानंतर निष्कर्ष 712 जिल्ह्यात सर्व्हे 923 नेत्यांना नामांकनं प्रशांत किशोर यांची कारकीर्द निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते. संबंधित बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर कुणाला साथ देणार?  2019 च्या निवडणुकीत मोदी आणि प्रशांत किशोर पुन्हा एकत्र?  प्रशांत किशोर : नीतिशकुमारांना बाहुबली बनवणारा चाणक्य!