हैदराबाद : भारतातील प्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नवरात्रीच्या ब्रह्मोत्सवात तिरुपती बालाजीच्या मंदिरात तब्बल 14 हजार लाडूंची अफरातफर झाल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकरणी मंदिर समिती विक्रेत्यांची चौकशी करत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने भावीकांसाठी लाडवाचा प्रसाद विकण्यास ठेवण्यात येतो. लाडू विकत घेण्यासाठी 100 आणि 50 रुपयाचे कुपन देण्यात येत होते. ह्या कुपन विक्रेते भाविकांकडून घेत त्याबदल्यात त्यांना लाडू देत होते. परंतू काही विक्रेत्यांनी कुपनचे झेरॉक्स काढून लाडू लंपास करत मंदिराबाहेर दुप्पट किमतीने विकले.
या घोटाळ्याची माहिती मंदिर समितीला मिळाल्यानंतर मंदिर समितीने याबाबत चौकशी केली. या चौकशी अंती तब्बल 14 हजार लाडवांची अफरातफर झाल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास मंदिर समिती करत आहे.
तिरुपती बालाजी मंदिरात लाडू घोटाळा, अवैध पद्धतीने विकले 14 हजार लाडू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2018 08:07 AM (IST)
या घोटाळ्याची माहिती मंदिर समितीला मिळाल्यानंतर मंदिर समितीने याबाबत चौकशी केली. या चौकशी अंती तब्बल 14 हजार लाडवांची अफरातफर झाल्याचे समोर आले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -