नवी दिल्ली: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या The Presidential Years या पुस्तकात नेपाळ आणि पंडित नेहरुंच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितलं की नेपाळमध्ये राणा राज संपल्यानंतर नेपाळला भारताचा एक हिस्सा बनवण्यात यावा असा प्रस्ताव होता, तो नेहरुंनी नाकारला.


प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहलंय की नेपाळचा तत्कालीन राजा वीर विक्रम शाह यांनी नेपाळला भारताचा एक भाग बनवण्यात यावा असा प्रस्ताव पंडित नेहरुंना दिला होता. परंतु नेहरुंनी हा प्रस्ताव नाकारला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते स्वतंत्र राहिले पाहिजे असं नेहरुंचं मत होतं.


प्रणव मुखर्जी आपल्या पुस्तकात लिहतात की वेगवेगळे पंतप्रधान, जरी ते वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी ते परराष्ट्र धोरण, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासनाच्या मुद्द्यावर वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात असं नेहरुंच मत होतं. लाल बहादुर शास्त्री यांनी नेहरुंच्या विचारापेक्षा अनेक वेगळे निर्णय घेतले होते अशीही नोंद त्यांनी ठेवलीय.


इंदिरा गांधींना संधी मिळाली असती तर...
प्रणव मुखर्जी यांनी असंही लिहलंय की नेपाळला भारताचा भाग करुन घ्यावा हा प्रस्ताव नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी यांना मिळाला असता तर त्यांनी ती संधी कधीच सोडली नसती. इंदिरा गांधींनी ज्याप्रमाणे सिक्किमचे विलिनीकरण केलं त्याप्रमाणे त्यांनी नेपाळलाही भारताचा हिस्सा बनवला असता.


कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा करिश्मा संपला
युपीए सरकार एका मध्यम स्तरातील नेत्यांचं सरकार बनलं होतं, कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा करिश्मा संपला हे न समजल्याने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रसची हार झाल्याचं प्रणव मुखर्जी लिहतात. प्रणव मुखर्जींनी हेही लिहलंय की नरेंद्र मोदी सरकार आपल्या पहिल्या कार्यकालात संसदेला योग्य पध्दतीने चालवण्यास अपयशी ठरलं, आणि त्यांच्या अहंकारात वाढ झाली. प्रणव मुखर्जींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


पहा व्हिडीओ: Pranab Mukherjee on Nehru | नेपाळचा भारतात विलीन होण्याचा प्रस्ताव नेहरुंनी फेटाळला : प्रणव मुखर्जी



संबंधित बातम्या:


'काँग्रेसच्या 2014 च्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंह जबाबदार', प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गौप्यस्फोट