बेळगाव : कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या पीपीई किटची बेळगावात निर्मिती होत असून केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र आणि अन्य राज्यात देखील या पीपीई किटचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाशी लढताना डॉक्टर आणि कोरोना वॉरीयरांना आवश्यकता भासते. पीपीई किटची आणि सध्या या किटचा तुटवडा पडतोय. पण बेळगावातील टीडी ग्रुप कंपनीने उत्कृष्ट दर्जाच्या वॉशेबल पीपीई किटची निर्मिती केली आहे.


पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्शन किटची कोरोना रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना आवश्यकता असते. सध्या या किटचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या बेळगावातील एका कंपनीत वॉशेबल पीपीई किटची निर्मिती करण्यात येत आहे.वडगाव मधील टीडी ग्रुप कंपनीचे मालक भरतेश उपाध्ये यांनी वॉशेबल पीपीई किटची निर्मिती सुरू केली आहे.


पॉलीप्रॉपीलिन कपड्याचा वापर करून पीपीई किट तयार केले जात आहेत. या किटमध्ये वन पीस पीपीई सूट, कॉटन फेस मास्क, प्लास्टिक फेसशिल्ड फिट कव्हर यांचा समावेश होतो. या पीपीई किट तयार करणाऱ्या कंपनीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, जिल्हा पंचायत सीईओ डॉ. राजेंद्र यांनी भेट देऊन जिल्हा रुग्णालयाला हे पीपीई किट पुरविण्यास सांगितले आहे. सध्या अनेक हॉस्पिटलकडून पीपीई किटची मागणी करण्यात येत आहे.


पीपीई किटच्या निर्मितीसाठी अत्यंत उच्च दर्जाच्या पॉलीप्रॉपीलिन कपड्याचा वापर केला जात आहे. केवळ चारशे पन्नास ग्रॅम इतके या किटचे वजन आहे. कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी हे पीपीई किट म्हणजे संरक्षक कवच आहे. हे किट पंधरा वेळा धुवून वापरता येते. पंधरा वेळ धुतल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना तपासताना हे किट वापरता येते. सध्या कर्नाटक,महाराष्ट्र आणि अनेक राज्यातून या किटची मागणी आहे, असे भरतेश तावनाप्पा उपाध्ये यांनी सांगितले.


संबंधित बातम्या :