दिवाळीनंतर सात दिवस उलटूनही दिल्लीला काळ्या धुरक्याचा विळखा पडला आहे. यामुळे सरकारी शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला जाणकार देत आहेत.
'राईट टू ब्रिथ'साठी दिल्लीकर रस्त्यावर
आम्हालाही श्वास घेण्याचा अधिकार आहे, यासाठी सर्वसामान्य दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर प्रदूषणाविरोधात दिल्लीकर एकवटले आहेत.
दिल्लीतील ट्राफिक हे प्रदूषणाचं एकमेव कारण असू शकत नाही, असं पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे. दिवाळीला सर्वाधिक फाटके दिल्लीत फोडण्यात आले. शिवाय पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचं पर्यावरण तज्ञांचं मत आहे.
दरम्यान या सर्वांचा त्रास सर्वसामान्य दिल्लीकरांना होत आहे. विषारी धुरक्यामुळे दिल्लीतील रस्त्यांवर दिवसाही अंधार दिसत आहे.