मुंबई: मुंबई कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन जयंत यादवनं आपल्या कारकीर्दीतील पहिलं शतक ठोकून एक मोठा विक्रम नावावर केला. जयंतच्या या शानदार खेळाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कर्णधार कोहलीसोबत क्रिकेटमधील अनेक दिग्गज जयंतच्या खेळीनं प्रभावित झाले आहेत.

चळवळीतील नेते आणि स्वराज पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी जयंत यादवबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. जयंतनं पहिलं शतक ठोकल्यानंतर योगेंद्र यादव यांनी ट्वीट करुन त्याचं कौतुक केलं. 'काका म्हणून मला 'जयंत यादवच्या पहिल्या कसोटी शतकाबद्दल अभिमान वाटतो. मजा आली.'

 

योगेंद्र यादव यांच्या या ट्वीटनंतर जयंत त्यांचा पुतण्या असल्याचं समोर आलं. दरम्यान, योगेंद्र यादव यांनी आपल्या फेसबूकवर याबाबत सविस्तर पोस्ट लिहली आहे.