मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेल्या बँका आज सुरू झाल्या. त्यामुळं आज एटीएमबरोबरचं बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळते आहे. सलग तीन सुट्ट्या आणि एटीएममध्ये असलेल्या खडखडाटामुळं लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले. मुंबई, पुणे असो किंवा विदर्भ मराठवाडा अनेक एटीएम पैशांअभावी रिकामे होते.


दरम्यान, आज नोटबंदीचा 35 वा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीसाठी देशातील नागरिकांकडे 50 दिवस मागितले आहेत. पण अद्यापही मोठ्या प्रमाणात पैशांची चणचण नागरिकांना जाणवते आहे. तीन दिवस बँकांना सुट्ट्या असल्याने एटीएमवर मोठ्या प्रमाणात भार आला. अनेक एटीएममध्ये काल  पैसे उपलब्ध नसल्यानं आता बँकांसमोर पुन्हा एकदा रांगा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आजपासून पेट्रोल-डिझेलचं डिजिटल पेमेंट करता येणार आहे. कॅशलेस पेमेंटवर ग्राहकांना 0.75% सूट मिळणार आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट, प्रीपेड लॉयल्टी कार्डच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे व्यवहार दिल्यास ही सूट मिळणार आहे.