Rahul Gandhi : काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) 22 नोव्हेंबरला गुजरातमध्ये (Gujarat Election) प्रचार करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेतल्यानंतर ते गुजरातला जाणार आहेत. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत सहा राज्यांतील 28 जिल्ह्यांना भेट दिली आहे
हिमाचल निवडणुकीत भाजपकडून टीकेला सामोरे
12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार न केल्याबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना भाजपकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. हिमाचलमधील निवडणुका संपल्याने काँग्रेसने आता गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मतदानाचे केंद्र असलेल्या राज्यात अनेक प्रचार रॅली नियोजित केल्या आहेत. या अंतर्गत, पक्षाकडून येत्या 15 दिवसांत एकूण 25 मेगा रॅलींचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. काँग्रेसच्या या आक्रमक रॅली निवडणुकीच्या रणनीती अंतर्गत असतील, ज्यामध्ये पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होतील.
मेगा रॅलीत कोण कोण सहभागी?
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे दोन्ही मुख्यमंत्री, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याकांचे मोठे नेतेही या गुजरातमध्ये निवडणूक रॅलीमध्ये सहभागी होत प्रचार करणार असल्याचे समजते. दरम्यान, गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यामुळे पक्षाने आतापर्यंत राज्यातील 142 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने 4 नोव्हेंबरला आपली पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात 43 उमेदवारांची नावे होती. 10 नोव्हेंबर रोजी 46 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यानंतर शुक्रवारी सात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. याशिवाय उमेदवार बदलण्याचीही माहिती देण्यात आली.
गुजरातमध्ये तिरंगी लढत
यावेळी गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी निवडणुकीत आम आदमी पक्षही मैदानात उतरून दोन्ही पक्षांना टक्कर देताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या