ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : अॅट्रॉसिटी संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या 20 मार्चच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. ‘भारत बंद’च्या दरम्यान देशातील काही भागात हिंसा झाली आणि त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. मात्र ग्वाल्हेरमध्ये एक तरुण ‘भारत बंद’मधील सहभागी जनतेवर गोळीबार करताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
गोळीबार करणाऱ्या या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. राजा चौहान असे या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात 308 कलामाअन्वये तक्रार दाखल केली आहे. राजा चौहान हा सध्या फरार असून, पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला आहे.
दुसरीकडे, राजा चौहान याच्या वडिलांचा दावा आहे की, बंदुकधारी तरुणाचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यातील तरुण हा राजा चौहान नाही. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान आता आणखी वाढलं आहे.
सुप्रीम कोर्टात आज काय झालं?
अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवरुन केंद्र सरकारला मोठा दणका बसला आहे. या कायद्याबाबत आधी दिलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सर्व पक्षकारांनी तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून,10 दिवसांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नसून, अटक आणि सीआरपीसीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे. निर्दोष लोकांच्या मुलभूत अधिकारांचा संरक्षण व्हावं आणि त्यांना त्रास होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे.
तसेच, अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
‘भारत बंद’वेळी गोळी झाडणाऱ्याचा शोध सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2018 09:58 PM (IST)
राजा चौहान याच्या वडिलांचा दावा आहे की, बंदुकधारी तरुणाचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यातील तरुण हा राजा चौहान नाही. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान आता आणखी वाढलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -