नवी दिल्ली: हेरगिरीच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान उच्च आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. भारतीय लष्कराचे गोपनीय दस्तावेज सापडल्याने मोहम्मद अख्तर या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र चौकशी करुन तूर्तास सोडून देण्यात आलं आहे.
मोहम्मद अख्तरसह दोन भारतीय हेर सुभाष आणि मौलाना रमजान यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मोहम्मद अख्तरच्या संपर्कात होते.
पाकिस्तानी हायकमिशनच्या अधिकाऱ्यांकडे भारतीय लष्कराची गोपनीय माहिती आलीच कशी याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मोहम्मद अख्तरची चौकशी करुन तूर्तास त्याला सोडण्यात आलं आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधींचं उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या गोपनीय माहितीचं प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे.