नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी चौकशी सुरु केली असती, तर पंजाब नॅशनल बँकेतील साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा रोखला जाऊ शकत होता. एका अशा व्यक्तीने हा दावा केला आहे, ज्याने पीएमओला चिठ्ठी लिहून सांगितलं होतं की, मेहुल चोक्सी बँकांकडून कर्ज घेऊन देशाला कसा लुटत आहे.


वैभव खुरानिया या व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे. वैभव खुरानियालाही मेहुल चोक्सीचा वाईट अनुभव आला आहे. त्यांनी 2013 साली मेहुल चोक्सीचा ब्रँड गीतांजलीची फ्रँचायझी घेतली होती. त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांची गुंतवणूकही केली. मात्र गीतांजली ब्रँडची जी ज्वेलरी मिळाली, ती अत्यंत खराब दर्जाची होती.

तक्रार केल्यानंतर गीतांजलीने वैभव यांच्याकडून ज्वेलरी परत घेतली, मात्र मोबदल्यात एक रुपयाही दिला नाही. ज्यामुळे त्यांना आपलं स्टोअर बंद करावं लागलं. त्यानंतर वैभव खुरानियांनी 2015 मध्ये पीएमओकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. 2016 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

पीएमओला पत्र तर लिहिलंच होतं. मात्र सीबीआय, सेबी आणि ईडीला याबाबत माहिती दिली होती. त्यावेळीच जर कारवाई केली असती तर मेहुल चोक्सी फरार होऊ शकला नसता. हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर पोहोचलंच नाही, असंही वैभव खुरानिया म्हणाले.

पीएनबीची मुंबई ब्रांच सील

साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संशयाच्या घेऱ्यात सापडलेली पीएनबीची मुंबईतील ब्रीच कँडी ब्रांच सीबीआयने सील केली आहे. या बँकेत आता कर्मचारीही येणार नाहीत. एवढा मोठा घोटाळा कसा करण्यात आला, याची चौकशी आता सीबीआयकडून करण्यात येणार आहे.

घोटाळ्यासंबंधित सर्व कागदपत्र तपास यंत्रणांना सोपवले

पीएनबी घोटाळ्यासंबंधित सर्व कागदपत्र तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहेत. यूपीए आणि एनडीए या दोन्हीही सरकारने या घोटाळ्याला गांभीर्याने घेतलं नाही. परिणामी साडे अकरा हजार कोटींचा घोटाळा झाला. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी दोघेही सध्या फरार आहेत.

संबंधित बातम्या :

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी


PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक


PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात


PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द


पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?


PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?


PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले


पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल