हैदराबाद : बॉयफ्रेण्डशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलत असतानाच तरुणीने आत्महत्या केली. हैदराबादमधील एका खासगी हॉस्टेलमध्ये शनिवारी (19 फेब्रुवारी) रात्री ही खळबळजनक घटना घडली. हनिशा चौधरी असे या तरुणीचे नाव होते.


पोलिसांच्या माहितीनुसार, हनिशा चौधरी या तरुणीने बॉयफ्रेण्डशी व्हिडीओ कॉलिंगवर बोलता बोलता टोकाचं पाऊल उचललं. दक्षित पटेल असे बॉयफ्रेण्डचे नाव आहे.

हनिशाचं बॉयफ्रेण्डशी किरकोळ भांडण झालं होतं, त्यावरुन तिने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. केवळ धमकी देत न थांबता, तिने स्वत:ला फासावर लटकवून घेतले. त्यानंतर तिचा बॉयफ्रेण्ड धावत हॉस्टेलमध्ये पोहोचला आणि त्याने हनिशाला तातडीने डॉक्टरकडे नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरने हनिशाला मृत घोषित केले.

हनिशा चौधरी ही हैदराबादमध्ये राहत होती. मात्र ती मूळची आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील होती.

पोलिसांनी हनिशाचा मोबाईल जप्त केला आहे. आता मोबाईल आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून आत्महत्येचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, हनिशाच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.