नवी दिल्लीः पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन माहिती सार्वजनिक केली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव भास्कर खुल्बे हे सर्वात जास्त वेतन मिळवणारे अधिकारी आहेत.


 

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळातही पीएमओने वेतन माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर माहिती अधिकाराअंतर्गत पीएमओने माहिती प्रसिद्ध केली आहे. सचिव भास्कर खुल्बे यांना पीएमओच्या अधिकाऱ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 2 लाख एक हजार रुपये एवढं मासिक वेतन आहे.

 

कोणाचं वेतन किती?

 

  • प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा- 1 लाख 62 हजार 500 रुपये

  • अतिरिक्त प्रधान सचिव पी. के. मिश्रा- 1 लाख 62 हजार 500 रुपये

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ- 1 लाख 62 हजार 500 रुपये

  • पीएमओ जनसंपर्क अधिकारी- 99 हजार 434 रुपये

  • संयुक्त सचिव तरुण बजाज- 1 लाख 77 हजार 750 रुपये

  • संयुक्त सचिव अनुराग जैन- 1 लाख 73 हजार 250 रुपये