रायसेन (मध्य प्रदेश) : ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या गायीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील सिलवानी गावात ही घटना घडली.


 

सिलवानीच्या ब्रम्हौरी दिल्हारी ओढ्यामध्ये रविवारी एक गाय वाहून जात होती. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने उपस्थितांनी गायीला वाचवण्याची जोखीम घेतली नाही. मात्र अशोक आणि राजू जोगी या पिता-पुत्राने गायीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यानंतर गायीला दोरीने बांधून बाहेर काढलं, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात धाडसी राजू जोगी बुडाला.

 

गायीला वाचवण्याचा व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांनी तरुणाला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. परंतु त्याला वाचवण्यासाठी कोणीही ओढ्यात उडी मारली नाही. यानंतर बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तब्बल चार तासांनंतर राजूचा मृतदेह त्यांच्या हाती लागला.

 

पाहा व्हिडीओ