नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच देशवासियांनाही त्यांनी दिवाळीमध्ये सैनिकांची आठवण ठेवण्याचे आवाहन करुन देशवासियांनी जवानांना शुभेच्छा देण्यास सांगितले. यासाठी ट्विटरवर #Sandesh2Soldiers या नावाने एक हॅशटॅग बनवण्यात आले असून त्याच्या माध्यमातून देशातील अनेक सेलिब्रिटींसह देशवासियांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.



पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान, अॅक्शन हिरो अक्षय कुमार यांच्यासह अनेकांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करुन, ''देशाचे संरक्षण करणाऱ्या सैन्य दलाच्या जवानांना आणि तरुणांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हॅप्पी दिवाली!'' #Sandesh2Soldiers


 

पंतप्रधानांच्या आवाहनाला बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने प्रतिसाद देत भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंन्टवरुन सैन्य दलाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने जवानांना शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.







याशिवाय, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोबाल, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्यासह अनेकांनी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.