देशाची प्रगती आणि विकासासाठी केंद्र सरकार काम सुरु ठेवेल, अशी आशाही जशोदाबेन यांनी व्यक्त केली आहे. 'पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्राचा निर्णय भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्यासही मदत होईल' असं जशोदाबेन म्हणाल्या.
राजस्थानमधील एका कार्यक्रमाला जशोदाबेन यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. मोदी सरकारच्या यशापयशाविषयी विचारलं असता जशोदाबेन यांनी कौतुकोद्गार काढले. केंद्र सरकार यापुढेही भारताच्या प्रगती आणि विकासासाठी काम सुरु ठेवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.