नवी दिल्ली : लाखोच्या सूटमुळे वादात सापडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मोदींनी महागड्या पेनमुळे लक्ष वेधून घेतलं आहे.


पंतप्रधान मोदींना पेन जमा करण्याचा छंद आहे. मोदी ज्या पेनने सही करतात, तो जगातील सर्वात महागडा पेन असल्याचं वृत्त 'इंडिया संवाद'ने दिलं आहे. हा पेन मोंटब्लॅक कंपनीचा आहे. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडेही असा पेन नाही.

लाखो रुपयाचा मोदींचा पेन

पंतप्रधान मोदी आपल्या खिशाला जे पेन लावतात, त्या पेनची किंमत शे-पाचशे किंवा हजार  नाही, तर लाखो रुपयात आहे. मोदी वापरत असलेल्या मोंटब्लॅक या कंपनीच्या पेनची किंमत 1 लाख 30 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातं. मोदींचा फेव्हरेट पेन 'मोंटब्लॅक इन पर्टिक्युलर' आहे.

मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वीपासूनच हा पेन वापरत आहेत.

कोणा-कोणाकडे हा पेन?

खरंतर पंतप्रधान मोदींपासून बराक ओबामांपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून दलाई लामांपर्यंत प्रत्येक नामवंतांना काहीना काही छंद आहेत. हे छंद मोठ्या गाडा, घड्याळांचा नाही तर महागड्या पेनचा आहे.

या सर्वांना पेन जमवण्याचा छंद आहे. मोदी, ओबामा, अमिताभ बच्चन यांच्याकडे विशेष असे पेन आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ही पेन कंपनी एकच आहे. या पेनसोबत प्रत्येकाचं भावनात्मक नातं आहे.