मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत.
धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळालं असून, त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
कॅबिनेट मंत्री -
1. धर्मेंद्र प्रधान
2. पियुष गोयल
3. निर्मला सीतारमन
4. मुख्तार अब्बास नक्वी
हे चारही जण याआधी राज्यमंत्री होते. त्यांना प्रमोशन मिळालं असून, कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
राज्यमंत्री -
1. अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार, भागलपूर येथून आमदार आणि बिहारचे आरोग्यमंत्री होते.
2. वीरेंद्र कुमार- लोकसभा खासदार, जे.पी. मूव्हमेंटशी निगडीत, टिकमगढ, मध्यप्रदेशमधून ६ वेळा खासदार
3. अनंत कुमार हेगडे- कर्नाटक लोकसभा खासदार
4. राजकुमार सिंग (आर. के. सिंग)- आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव
5. शिवप्रताप शुक्ला- राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश
6. हरदीपसिंग पुरी- माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपत प्रवेश
7. सत्यपाल सिंग- मुंबई पोलिस माजी आयुक्त, बागपत येथून पहिल्यांदाच खासदार
8. अल्फोन्ज कन्ननाथम - केरळ, माजी आयएएस अधिकारी
9. गजेंद्रसिंग शेखावत- जोधपूर, राजस्थान
हे 9 नवे चेहरे मोदींच्या टीममध्ये समाविष्ट झाले आहेत. यात 4 माजी अधिकारी आहेत. 2019 च्या दृष्टीने यातील सर्वजण महत्त्वाचे मानले जात आहेत.
नवीन चेहऱ्यांमध्ये चार माजी अधिकारी -
1. सत्यपाल सिंग- मुंबई पोलिस माजी आयुक्त
2. राजकुमार सिंग (आर. के. सिंग)- माजी गृहसचिव
3. अल्फोन्ज कन्ननाथम - केरळ, माजी आयएएस अधिकारी
4. हरदीपसिंग पुरी- माजी आयएफएस अधिकारी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोदींनी ज्या 9 नवीन चेहऱ्यांच्या खांद्यावर राज्यमंत्रिपदाची धुरा दिली आहे. त्यांच्यामध्ये वरील 4 माजी अधिकारी आहेत.
संबंधित बातमी : एनडीएचा मृत्यू झाला आहे, शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया
2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2017 11:14 AM (IST)
एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -