नवी दिल्ली : 29 ऑगस्ट रोजी दुरान्तो एक्स्प्रसमधील हजारो प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोको पायलटचा रेल्वेकडून सत्कार करण्यात आला. विरेंद्र सिंह असं या लोको पायलटचं नाव असून, दिल्लीतील रेल्वे भवनमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला.


मंगळवारी (29 ऑगस्ट) रोजी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरान्तोचे डबे रूळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. मात्र सुदैवानं लोको पायलटनं आपात्कालिन ब्रेक दाबल्यानं हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

त्यांच्या याच कामगिरीबद्दल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्या तर्फे लोको पायलट विरेंद्र सिंह आणि असिस्टंट लोको पायलट अभय कुमार यांचा सत्कार करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी या दोघांच्या कामाचा गौरव केला.

दरम्यान, दुरान्तो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा-आसनगाव ही लोकल सेवा गेले तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद होती. या मार्गावरील रेल्वेचे डबे काढण्यास वेळ लागत असल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

मात्र, आज तब्बल तीन दिवसांच्या रखडपट्टीनंतर टिटवाळा-आसनगाव लोकलसेवा अखेर सुरु झाली. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज सकाळपासून या मार्गावरील लोकलसेवा सुरु झाली.

संबंधित बातम्या

4 दिवसांपासून ठप्प टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक आजपासून सुरु होणार

पोलिसांनी आंदोलक प्रवाशांना हटवलं, वाशिंदमधील रेलरोको मागे

दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे कल्याणजवळ घसरले