गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा सुरु आहे.

अक्षरधाम हे आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरेचं प्रतीक असल्याचे गौरवोद्वार यावेळी मोदींनी काढले. गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर 1992 साली उभारण्यात आलं.

निवडणुकीच्या काळात अक्षरधाम मंदिराला भेट देणं महत्वपूर्ण मानलं जातं. पाटीदार समाजाची अक्षरधाम मंदिरावर श्रध्दा आहे. गुजरातमध्ये 15 टक्के पाटीदार समाज आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत या समाजानं भाजपला साथ दिली, मात्र हार्दिक पटेलनं आरक्षणाचा मुद्दा उठवल्यानंतर पाटीदार भाजपवर नाराज आहेत.

डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 18 डिसेंबरला निकाल असून गुजरात राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.