स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता यंदा लाल किल्ल्यावर विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे. यावेळी एअर बलून उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मेट्रो आणि दिल्लीतील महत्वाचे रस्तेदेखील बंद करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांचे 5000 जवान लाल किल्ल्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. तर हवाई हल्ला निष्प्रभ करण्यासाठी अँटी एअरक्राफ्ट गन्सही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय हजारो सीसीटीव्हीची नजर कार्यक्रमातील उपस्थितांवर असणार आहे.
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करणार आहेत. त्यानंतर राज्याला संबोधित करतील.