नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील नागरिकांना उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे :
1. देशातील सत्ताधारी आण विरोधकांनी सोबत येऊन काम केलं.
2. जीएसटी विधेयक मंजुरीने देशातील एकी दिसून आली.
3. महिला, लहान मुले यांच्यावरील अत्याचार म्हणजे आपल्या सभ्यतेवर हल्ला आहे.
4. गरीब, मागासवर्गीयांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात सक्तीने लढलं पाहिजे.
5. कुणी एखादी व्यक्ती किंवा संस्था आपले स्वत:चे कायदे या देशात राबवू शकत नाही.
6. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश आपली राज्यघटना देते.
7. आपल्याला एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा.
8. सक्षम राजकीय इच्छाशक्तीतूनच कुशल भारताची निर्मिती होईल.
9. भटके-विमुक्तांना मुख्य प्रवाहाशी जोडायला हवं.
10. भारता विकासाच्या वाटेवर आहे आणि जगाला हे कळलंही आहे.