नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री त्यांच्या निवासस्थानी भेटीला आल्या होत्या. या भेटीचे फोटो पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

 
मोदींनी आपल्या 7 आरसीआर या निवासस्थानाची सैर मातोश्रींना घडवली. व्हिलचेअरवर बसवून त्यांनी परिसरातील बगिच्यात नेलं.

 
'माझी आई गुजरातला परतली. मोठ्या कालावधीनंतर तिच्यासोबत क्वॉलिटी टाइम घालवता आला, तेही आरसीआरला तिने दिलेल्या पहिल्या भेटीत' असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

 

https://twitter.com/narendramodi/status/731833470289350656