PM Narendra Modi Speech On No Confidence Motion : काँग्रेसची नीती चांगली नाही, त्यांची नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर नो कॉन्फिडन्स दाखवला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातल्या अनेक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारलं असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर आणि काँग्रेसवर टीका केली. 


पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे,


विरोधकांना देवाने सुबुद्धी दिली आणि अविश्वास प्रस्ताव आणला, त्यांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी शुभ संकेत. 2024 साली आम्ही विक्रमी जागांसह सत्तेत येणार. 


विरोधकांनी पहिल्यापासून जर गांभीर्याने कामकाजात भाग घेतला असता तर अनेक विधेयक सहमत होऊ शकले असते. 


विरोधकांनी फिल्डींग आमच्यासाठी सजवली, पण चौके आणि छक्के आमच्याकडून लागले. तिकडून फक्त नो बॉल पडत राहिले. 


ज्यांचे स्वत: चे हिशोब बिघडलेत ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत. 


यावेळी सर्वात मोठ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना भाषण करु दिलं नाही, त्यांचं नावच या यादीत नाही. 


काँग्रेसकडे ना नीती आहे ना नियत आहे, इतकी वर्षे सत्ता भोगूनही काँग्रेस अनुभवशून्य. 


माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातल्या सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांच्या यादीत असेल. 


गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी माझ्याविरोधात जेवढे काही अपशब्द वापरायचे तेवढे वापरले. पण ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्यांचं मन काहीसं हलकं झालं असेल. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांच्या आवडता नारा आहे. 


विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही गुप्त वरदान मिळालं आहे, ते लोक ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचं चांगलंच होतंय. गेल्या नऊ वर्षात माझ्याविरोधात अनेक गोष्टी केल्या, पण माझं चांगलंच झालं. 


देशातील बँकिंग सेक्टर नष्ट होईल, परदेशातून काही लोकांना आणून हे सांगितलं जात होतं. पण आमची सार्वजनिक बँक चांगलं काम करत असून त्यापेक्षा सर्वात चांगलं काम करत आहे. 


HAL संदर्भाता विरोधकांनी संभ्रम तयार केला, कर्मचाऱ्यांना भडकवलं. या संदर्भात विरोधकांनी वाईट सांगितल, मात्र HAL पुढे पोहचलयं, रेव्हेन्यू फायद्यात आला आहे. 


एआयसीच्या संदर्भात विरोधकांनी संभ्रम तयार केला, मात्र आता एलआयसी कुठच्या कुठे पोहचलयं, यशस्वी होतंय. विरोधक जी संस्था संपेल असं सागतंय ती संस्था मजबूत होते. 


देशाला विश्वास आहे, 2028 मध्ये तुम्ही जेव्हा अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर असेल. 


देशात काँग्रेसवर जनतेचा विश्वास नाही, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, ओडिशा, नागालँड,  पश्चिम बंगालच्या जनतेने काँग्रेला नाकारलं आहे.  तामिळनाडूत काँग्रेस 1962 मध्ये जिंकली होती, काही दिवसापूर्वी युपीएचा क्रिया-कर्म केलं. 


काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय काँग्रेसने मतांसाठी गांधी नावही चोरलं.  


ही बातमी वाचा: