PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 88 वा भाग आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान मोदी यांचा रेडिओवरून प्रसारित होणारा मासिक कार्यक्रम आहे. याद्वारे पंतप्रधान प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता जनतेला संबोधित करतात. आज पंतप्रधानांनी 'मन की बात' द्वारे विविध विषयांवर जनतेला संबोधित केला. 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, देशाला नवीन संग्रहालय मिळालं आहे. पीएम म्युझियममधून जनतेला पंतप्रधानांशी संबंधित रंजक माहिती मिळत आहे. त्यामुळे इतिहासाबद्दल लोकांची आवड वाढली आहे.

पंतप्रधान यावेळी म्हणाले की, 'तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI) झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत आहेत.'

 

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता यावरून कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. त्यामुळे स्वच्छतेसारख्या विषयांसोबतच जलसंधारणाचा मुद्दा 'मन की बात'मध्ये वारंवार उपस्थित करणे गरजेच आहे. देशातील बहुतांश भागात उष्णता झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे. तुम्ही आता जिथे आहात तिथे भरपूर पाणी उपलब्ध असू शकते. पण, पाण्याचा ताण असलेल्या भागात राहणार्‍या करोडो लोकांचाही तुम्हाला विचार करावा लागेल, ज्यांच्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतसारखा आहे. यामुळेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'त जलसंधारण हा एक महत्त्वाचा संकल्प आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :