नवी दिल्ली : पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व सामन्यांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अर्थसंकल्पाचं स्वागत केलं.


यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना, तीन कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदात्यांना आणि 30 कोटींहून अधिक कामगारांना थेट लाभ मिळणार आहे,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला नवी ताकद मिळेल. अल्पभूधाक शेतकऱ्यांना मदत, कामगारांना पेन्शन आणि बोनस, सैनिकांना दुप्पट पेन्शन आणि मध्यमवर्गीय करदात्यांना कर टप्प्यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील 130 कोटी जनतेला नवी ऊर्जा देणारा हा अर्थसंकल्प आहे, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.


या अर्थसंकल्पातून गरीबांना शक्ती मिळेल. शेतकऱ्यांना मजबुती देईल, कामगारांना सन्मान मिळेल, मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण होतील, नियमित कर भरणाऱ्यांचा गौरव केला जाईल. देशाचा विश्वास मजबूत करेल. तसेच नवभारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील 130 कोटी नागरिकांना नवी ऊर्जा देईल, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.


संबधित बातम्या 


अर्थ बजेटचा : पियुष गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


'पाच लाखा'चं करमुक्त उत्पन्न आणि फुस्स झालेला फुगा


अर्थ बजेटचा : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उसळी


अर्थ बजेटचा : मध्यमवर्गीयांना दिलासा, पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त


अर्थसंकल्प 2019 : छोट्या शेतकऱ्यांना दिलासा, वर्षाला 6 हजार रुपये मिळणार


अर्थसंकल्प 2019 : 60 वर्षांवरील कामगारांना पेन्शन मिळणार


अर्थ बजेटचा : पियुष गोयल यांच्या पोतडीतून रेल्वेला काय मिळालं?


अर्थ बजेटचा : संरक्षण खात्यासाठी 3 लाख कोटींची तरतूद